ताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादीची पुण्यासाठी ‘विकासाची पोलखोल स्पर्धा’ ; सेल्फी, व्हिडिओसाठी 11,000 बक्षिस

पुणे | महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘विकासाची पोलखोल स्पर्धा’ आयोजित केली आहे. यामध्ये नागरिकांना विविध समस्यांची सेल्फी व व्हिडिओ करुन पाठवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी सेल्फी व व्हिडिओसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, माजी महापौर, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी याबाबत ट्वीटवर स्पर्धेची घोषणा केली आहे. स्पर्धकांनी शहरातील, आपल्या परिसरातील खड्डे, कचरा, सांडपाणी, वाहतूक इत्यादी समस्या अधोरेखित करणारे सेल्फी अथवा व्हिडिओ काढून पाठवण्याचे आवाहन त्यांनी ट्वीटवर वरुन केलं आहे.

‘गेल्या साडेचार वर्षात पुणे शहराची प्रचंड वाताहत झालेली असताना, पुणेकरांना पायाभूत सुविधा मिळणेही दुरापास्त झालेले असताना सत्ताधारी भाजपकडून शहरा खोट्या जाहिरातीचे बॅनर लावण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांच्या या खोट्या जाहिरातीची पोलखोल करून शहराची सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे,’ पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button