breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सामाजिक कार्यकर्ते लहू बालवडकरांना ‘पुणे रत्न सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान

  • राज्यातील दिग्गज नेत्यांच्या हस्ते झाला गौरव

पुणे – एका वृत्तवाहिणीच्या वतीने शुक्रवारी (दि. ३) पुणे रत्न सन्मान २०२१ या पुरस्कार प्रदानाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यात आला. समाजोपयोगी कामांची दखल घेऊन लहू बालवडकर सोशल वेल्फेअरचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप सदस्य लहू बालवडकर यांचा ‘पुणे रत्न सन्मान २०२१’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

पुणे रत्न सन्मान २०२१ सोहळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विशेष उपस्थितीत व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड विधानसभेचे आमदार, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार लहू बालवडकर यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास, अमृता फडणवीस, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार राहुल कुल, आमदार रोहित पवार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार रणजितसिंह निंबाळकर, पुण्याचे महापौर मुरलीअण्णा मोहोळ, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.

 Awarding 'Pune Ratna Sanman 2021' to social activist Lahu Balwadkar

यावेळी लहू बालवडकर म्हणाले, माझ्यावर कायमच प्रेम करणारे व माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे समस्त बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथील नागरिक यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्विकारला, याचा मला नक्कीच अभिमान आहे. माझ्या पाठीशी प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभा असणारा माझा मित्रपिरवार, माझे सर्व कुटुंबीय, मार्गदर्शक यांचे देखील याप्रसंगी मन:पूर्वक आभार. इथून पुढच्या काळात माझ्यावर तुम्ही दाखवलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ करीन.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते लहु बालवडकर हे सोशल वेलफेअरच्या माध्यमातून संकटकालीन परिस्थितीत गरिब आणि गरजू नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. त्यामध्ये आरोग्य, अन्नधान्य यांसह आर्थिक समस्यांनाही हातभार लावतात. लहु बालवडकर यांनी बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील २५०० नागरिकांचे लसीकरण करून लोकप्रतिनिधीसमोर एक नवा आदर्श ठेवला होता. तसेच, काही दिवसांपूर्वी भारतातील 12 शक्तीपीठांच्या पादुका दर्शन सोहळा देखिल आयोजित केला होता. त्यातच आता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. याचीच पावती म्हणून एका वृत्तवाहिणीने दखल घेऊन पुणे रत्न सन्मान २०२१ हा पुरस्कार बालवडकरांना प्रदान केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button