breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची जंबो कार्यकारिणी जाहीर!

तरुण सर्वसमावेशक टीम सज्ज; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोपवली जबाबदारी

पिंपरी : राष्ट्रवादीच्या पिंपरी येथील नवीन आणि सुसज्ज पक्ष कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे यांची टीम जाहीर करण्यात आली. नंतर झालेल्या जाहीर मेळाव्यात नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-१५, सरचिटणीस-३, चिटणीस-९, संघटक-२ अशी एकूण ५४ जणांचा सहभाग आहे.

कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देवेंद्र तायडे यांना देण्यात आली, तर सरचिटणीसपदी राजकीय क्षेत्रात ब्रँड कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेले जयंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर माजी नगरसेविका शकुंतला भाट आणि आपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अशोक तनपुरे यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली. तसेच फादर बॉडीच्या चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक मधुकर चिंचवड यांचे चिरंजीव सागर चिंचवडे तर माजी स्टँडिंग कमिटी चेयरमन राजाराम कापसे यांचे चिरंजीव प्रशांत कापसे यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी आणि भोसरी विधानसभेची जबाबदारी ज्ञानेश्वर आल्हाट यांना देण्यात आली.

अरुण थोपटे यांची सेवादल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांची मुख्य समन्वयक पदी तर उच्चाशिक्षित असलेले माधव पाटील यांची मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. सविता खराडे, धीरज तमाचीकर, अमित तापकीर , अनिल भोसले, महेश इंगवले, सतीश भोईर, माणिक जैद पाटील, अमोल गाडेकर, काशिनाथ बामणे, संदीप गायकवाड, गणेश भांडवलकर, विनोद धुमाळ, मीना नाणेकर शशिकांत निकाळजे आणि दिलीप पानसरे यांची शहर उपाध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्रे देण्यात आली.

हेही वाचा  –  उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा; म्हणाले, आगामी निवडणुकीत..

संघटक म्हणून राजू खंडागळे आणि विवेक विधाते यांची नियुक्ती झाली. तसेच विजय बाबर, योगेश सोनावणे, पोपट पडवळ, राहुल धनवे, अंबादास बेळसांगवीकर, उज्वला पोकळे, कमलेश वाळके, सिद्धार्थ गायकवाड तसेच आपमधून आलेले विजय अब्बड यांची शहर चिटणीस पदी वर्णी लागली. यावेळी विविध सेल अध्यक्ष नेमण्यात आले. गणेश काळे यांना झोपडपट्टी सेल शहराध्यक्ष, अल्ताफ शेख यांना अप्लसंख्यांक सेल, ज्योती जाधव यांना अर्बन सेल, विजय कुमार पिरंगुट यांना उद्योग व्यापार सेल, वंदना आराख यांची असंघटित कामगार घरेलू महिला अध्यक्षपदी, अनिता गव्हाणे यांची पर्यावरण सेल अध्यक्षपदी, संदीप यशवंत शिंदे यांची कामगार सेल अध्यक्षपदी राहुल गोडसे यांची आयटी सेल शहराध्यक्षपदी शौल कांबळे यांची ख्रिश्चन सेल आणि मयूर जाधव यांना सामाजिक न्याय सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती पत्र देण्यात आले. माधुरी रुबदी यांची ख्रिश्चन सेलच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच राजरत्न शिलवंत यांची खजिनदार म्हणून तर नियुक्ती करण्यात आली. हेमंत बलकवडे, सुहास देशमुख, दीपक लांघी, डॉ. गुणवंत पाटील, योगेश शहा, प्रशांत बाबेल, देवा नखाते, चंद्रकांत जाधव यांची शहर कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली.

तुषार कामठेंच्या नेतृत्त्वात संघटना सक्षम होईल – जयंत पाटील

नवीन कार्यकारिणी सर्वसमावेशक असून तीनही विधानसभेच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना समसमान संधी देण्यात आली आहे. शहर कार्यकारिणीत महिलांना सुद्धा मोठी संधी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात ही नवीन कार्यकारिणी राष्ट्रवादी वाढवण्याचे काम करेल तसेच शहरातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्कीच चांगले काम करेल, असे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button