breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महापालिकेने शिवसप्ताह साजरा करावा

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महापालिकेकडे मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेने शिवसप्ताह साजरा करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.  निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात तीन दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात यावा, तसेच शिवजयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम न राबविल्यास पालिके विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जीवन बोराडे, प्रकाश जाधव, सतीश काळे, नकुल भोईर, सागर तापकीर, वैभव जाधव, धनाजी येळकर-पाटील, युवराज कोकाटे, नानासाहेब वारे, मारुती भापकर, प्रवीण पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

याबाबत महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यात निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका अनेक थोर महापुरुषांच्या जयंती साजरे करते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. त्यानूसार राज्यभरात १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती देखील महापालिका प्रशासनाने मोठ्या स्वरूपात साजरी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा केली आहे. 

मात्र राज्य सरकारने ११ नोव्हेंबर २०१७ रोजी काढलेला अध्यादेश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दाखवित शिवजयंती साजरी करण्यास महापालिका अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे शिवजयंती देखील मोठ्या स्वरूपात साजरी करावी. त्यानिमित्ताने शिवसप्ताहांतर्गत शाळांमध्ये बालशिवाजी स्पर्धा, निबंध, वक्‍तृत्व, चित्रकला, पोवाडा गायन स्पर्धा आयोजित कराव्यात. तसेच विजेत्या स्पर्धकांना शिवचरित्र पुस्तक, स्मृतीचिन्ह व मानधन देण्यात यावे. याशिवाय शिवजयंतीनिमित्त तीन दिवस भक्‍ती-शक्‍ती चौकात प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button