Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

महाराष्ट्राला हादरवणारी हत्येची घटना, नवनीत राणांचं अमित शहांना पत्र, NIA कडे तपास सुपूर्द

अमरावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या मृत्यूची NIA मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उदयपूच्या कन्हैया लाल साहू हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती अमरावतीत झाली आहे. या हत्येचा संबंध पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचं समर्थन केल्यानेच झाला आहे, असा आरोप स्थानिक भाजपने केला. या आरोपाला अमरावती पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मृत उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट केली होती. त्यामुळेच आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं अमरावती पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

उमेश कोल्हे हे पेशाने केमिस्ट होते. त्यांचे जनावरांच्या औषधाचे दुकान आहे. 21 जून रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी परतत होते. त्यानंतर काही लोकांनी वाटेतच त्याचा गळा चिरून खून केला. सुरुवातीला परस्पर वैमनस्यातून हा खून झाल्याचं मानलं जात होतं. मात्र आतापर्यंतच्या तपासात असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, पोलीस अधिक तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोहेब खान, अतिप रशीद आणि युसूफ खान यांचा समावेश आहे.

अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या झाली होती. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अमरावती पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ केली आहे. कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्याबाबत गृह मंत्रालयाने ट्विट केले आहे. एनआयएला हत्येशी संबंधित संघटना आणि तिचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि इतर पैलूंची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही याप्रकरणी अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. एनआयएमार्फत तपास करुन संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. त्यानंतर काही वेळातच हा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button