breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चाकणमधील सीएनएचन्यू हॉलंड कंपनीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

पिंपरी / महाईन्यूज

सीएनएचन्यू हॉलंड कंपनी चाकणमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन. डी. आर. एफ.) यांच्या द्वारा आयोजित प्रात्याक्षिकांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.

४ मार्च ते ११ मार्च या काळात संपूर्ण जगभरातील औद्योगिक क्षेत्रात “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” साजरा केला जातो. यावर्षीचा सुरक्षा सप्ताहाचा विषय होता नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन. डी. आर. एफ.) याच कामासाठी स्थापित करण्यात आलेली  आहे.

याच संधीचे औचित्य साधून सी एन एच न्यू हॉलंड कंपनी चाकण मध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन. डी. आर. एफ.) यांच्या प्रात्याक्षिकांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने भूकंप, आग, पूर, भूस्खलन आणि रसायन गळती या आपत्ती संदर्भात मागदर्शन करून या आपत्ती आल्याचे ओळखण्यासाठीचे घरगुती उपाय, आपत्ती आल्यावर घ्यावयाची काळजी, त्यामधून होणारी इजा व त्यावरचे उपाय आणि मानव हानी कमी करण्याचे उपाय यांचे प्रात्याक्षिक एन. डी. आर. एफ. जवानांनी केले.

कामगार सुरक्षित तर कारखाना सुरक्षित, कारखाना सुरक्षित तर समाज सुरक्षित आणि समाज सुरक्षित तर देश सुरक्षित हा फार मोलाचा संदेश यावेळी एन. डी. आर. एफ.चे वतीने असिस्टंट कमांडण्ट कुमार राघवेंद्रा यांनी दिला आणि पुढील काळात चाकण येथील औद्योगिक क्षेत्रात असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. तसेचस यावेळी सी एन. एच. न्यू. हॉलंड कंपनी चाकणचे प्लांट हेड किशोर देवळे यांनी एन. डी. आर. एफ. आपत्ती व्यवस्थापन करत असलेल्या भरीव कार्याचा उल्लेख करीत सर्व उपस्थित जवानांचा गौरव केला.

या कार्यक्रमास एन. डी. आर. एफ.चे वतीने डेप्युटी कमांडंट प्रमोद कुमार सिंग,  असिस्टंट कमांडण्ट कुमार राघवेंद्रा, इन्स्पेक्टर राजेंद्र पाटील, इन्स्पेक्टर जेना हे हजार होते. तर, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक व समन्वयक म्हणून कंपनीचे संपर्क अधिकारी शंकर साळुंखे यांनी भूमिका पार पडली तर मानवी संसाधन विभाग प्रमुख शीतल साळुंके यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमातून कंपनीतील कामगार व अधिकारी यांना मिळालेल्या माहितीतून नक्कीच कंपनीला आणि त्यांचे कुटुंबाला फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मानवी संसाधन व प्रशासकीय विभागातील प्रशांत बेलवटे, शैलेश जाधव, ब्रिजेश शाहू, आनंद जोशी, अमित कणसे, रिया सोळंकी, आकाश पिंजण तर सुरक्षा विभागातील सुधाकर पाटील आणि लक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button