breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

अजित पवारांची नार्को टेस्ट करा’; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरून दमानियांनी अजितदादांना घेरलं

Anjali Damania on Ajit Pawar : अंजली दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केल्यानं पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. दमानियांनी अजित पवारांबाबत अनेक सवाल उपस्थित केल्यामुळे राजकारण तापलंय

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलंय. या प्रकरणात अंजली दमानियांनी अजित पवारांचं नाव घेतल्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय. अंजली दमानियांनी थेट अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीय. अजित पवार खोटं बोलत आहेत. त्यामुळे त्यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता. तर हा आरोप पुणे पोलिसांनी फेटाळून लावलाय. मात्र अंजली दमानिया एका आरोपावर थांबल्या नाहीत तर त्यांनी अजित पवारांच्या भूमिकेवल संशय व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – कसोटीवर किती खरे उतरतात एक्झिट पोल? 2019 मधील अंदाज किती ठरला खरा

दमानियांचे अजितदादांना सवाल

आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्ही सीपी ऑफिसमध्ये ठिय्या मांडून का बसला नाहीत?

जेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा तुम्ही पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शेजारी का बसला नाहीत?

कुठलीही प्रक्तिक्रिया द्यायला ४ दिवस का लागले ? ते पण पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर का बोललात ?

घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात ?

तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का ?

क्षुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार, पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते?

जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत ?

पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी दमानियांनी केलेले आरोप मात्र अजित पवारांनी फेटाळून लावलेत. मी कुठल्याही आरोपीला पाठीशी घालण्यासाठी फोन करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दमानियांच्या आरोपानंतर अजित पवारांभोवती संशयाचं ढंग जमू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सरकार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button