breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

सिध्दरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? उद्या होणार शपथविधी!

मुंबई : कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतमोजणीत २२४ पैकी १३५ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्वावाद बहुमत मिळवलं आहे. तब्बल १० वर्षांनी काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता बहाल केली आहे. त्यामुळे कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिध्दरामय्या यांच्या गळ्यात पडली आहे. तर डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. सिध्दरामय्या यांनी यापुर्वीदेखील मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला आहे. ते उद्याच पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या नावीची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा – ‘मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर..’; अनिल देशमुखांचा मोठा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दारमय्या हे उद्या दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्वाची खाती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या बंगळुरूमध्ये विधिमंडळ दलाची बैठक होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button