breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सरन्यायाधीशपदासाठी शरद बोबडे यांच्याकडून एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्याअखेरीस म्हणजे २३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव मागविण्यात आले होते. त्यानुसार सरन्यायाधाशी शरद बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली आहे. दरम्यान, केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सुचविण्याची सूचना करण्यासाठी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना पत्र पाठवले होते.

वाचा :-कोरोनाचा उद्रेक! देशात 24 तासांत 47,262 नव्या रुग्णांची नोंद

कोण आहेत एन.व्ही. रमण?
६४ वर्षीय रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्या वकिलीला सुरुवात केली. न्यायमूर्ती रमण यांनी यांचे बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेले असून संविधान, फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. पोन्नावरम हे गाव कृष्णा जिल्ह्यात येते.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते. सध्या शरद बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button