breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

आज शेवटचा श्रावणी सोमवार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

पंढरपूर – आज सोमवती अमावास्या आणि श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार. या निमित्ताने हरिहराचे प्रतीक असलेल्या विठ्ठल मंदिरात अत्यंत मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठलचरणी फुल सजावटीची सेवा अर्पण केली असून विठ्ठल मंदिरातील कर्मचारी असलेल्या शिंदे बंधू यांनी ही सजावट साकारली आहे.

विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबीमध्ये उत्तम रंगसंगतीचे फुलांचे पडदे, फुलांची झुंबरे आणि मंडप बनविण्यात आला असून विठ्ठल-रुक्मिणीसमोर फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. झेंडू, गुलछडी, गुलाब, लिली अशा विविध रंगांच्या फुलांचा या सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button