breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडराष्ट्रिय

मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

पिंपरी : “आम्ही,भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करू आणि आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू” अशी शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत घेतली.

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी दिगंबर चिंचवडे, विशाल भुजबळ, मदन चिंचवडे, नंदू घुले, शेखर गावडे आणि उमेश बांदल यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
२१ मे हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुण्यतिथी दिवस, दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून देशभर पाळला जातो तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button