breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट खेळाडूंचा महापालिकेतर्फे सत्कार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट खेळाडूंचा त्यांच्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महापौर कक्षात झालेल्या या कार्यक्रमास जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे उपस्थित होत्या. भारत सरकार मान्यताप्राप्त स्पर्धेचे, हिमाचल प्रदेश येथे दिनांक 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2021 सोलन, हिमाचल प्रदेश येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 26 राज्यातील एकूण 1500 विध्यार्थी सहभाग नोंदवीला होता. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करुन 28 पैकी 25 पदके जिंकली आणि महाराष्ट्र राज्यासोबत पिंपरी-चिंचवड शहराचे नावलौकिकात भर पाडली आहे.

11 वी राष्ट्रीय कुडो स्पर्धा विजयी विद्यार्थी – सुवर्ण पदक विजयी विद्यार्थी गार्गी मोरे, मृण्मयी काळोखे, भक्ती हगवणे, पीयुष मेश्राम, अंजली सपाटे, क्षितिज धनवे, सिद्धार्थ चव्हाण, रौप्य पदक विजेते विद्यार्थी – प्रतिक चासकर, सानिका सगर, पृथ्वीराज इंगळे, सुहास धाईंजे, हरमेहर कटारिया, खेणन पाटील, खुशी वाघचौरे, कांस्य पदक विजेते विद्यार्थी – प्रथमेश भोंडवे, आर्यन पवार, आर्या पवार, चाहत पठाण, आर्यन हगवणे, शिवम विघ्ने, धनश्री कोळी, समृद्धी खंदारे, श्लोक दीक्षित,तेजस सुर्वे, जयवंत समल.

राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी विद्यार्थी यांना शीतल मोरे, सुहास धाईंजे, राहुल पवार यांनी प्रशिक्षण दिले आहे. स्पर्धेत सर्व विजयी विद्यार्थ्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारद्वारा सरकारी नोकरीत आरक्षण मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button