breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्तांचा दणका; बोगस ‘एफडीआर’ प्रकरणी १८ ठेकेदार ३ वर्षांसाठी काळ्या यादीत

पिंपरी – कंत्राट मिळविताना बनावट फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक करणा-या १८ ठेकेदारांना ३ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना ३ वर्ष महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच त्यातील १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

महापालिकेची निविदा प्राप्त करत असताना जी कामे १० टक्यापेक्षा कमी दराची असतात, ती कामे पुढील प्रत्येक कमी दरासाठी अनामत रक्कम, बँक हमी किंवा एफडीआर भरून घेतली जातात. त्यानंतर या कामांना मंजूरी देऊन स्थायी समितीच्या मान्यतेने करारनामा करून कामाचे आदेश दिले जातात. परंतु, गेल्या काही दिवसात बोगस बनावट बँक हमी, एफडीआर सादर करुन महापालिकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.

मागील तीन वर्षातील सुमारे १०७ कंत्राटांमध्ये बोगस एफडीआर आणि बँक हमी देऊन महापालिकेची फसवणूक करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारे महापालिकेची फसवणूक होऊ नये यासाठी अशा ठेकेदारांना काळया यादीत टाकणे तसेच बनावट एफडीआर सादर करून कामे मिळविळेल्या ठेकेदारंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘या’ ठेकेदारांना टाकले काळ्या यादीत !

मे.डी.डी.कन्स्ट्रक्शन, मे.वैदेही कन्स्ट्रक्शन, मे.एस.बी.सवई, मे.पाटील अँण्ड असोसिएट्स, मे.कृती कन्स्ट्रक्शन, मे.राधिका कन्स्ट्रक्शन, मे.बी.के.कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजिनिअरींग, मे.भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, मे.त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, मे.श्री दत्तकृपा एंटरप्रायजेस, मे.चैतन्य एंटरप्रायजेस, मे.डी.जे.एंटरप्रायजेस, मे.दीप एंटरप्रायजेस, मे.बी के खोसे, मे.म्हाळसा कन्स्ट्रक्शन प्रा.लि., मे.एच ए भोसले, मे.सोपान जनार्दन घोडके आणि मे.अतुल आर.एम.सी. यांनी सादर केलेल्या बँक हमी / एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या १८ ठेकेदारांना निविदा भरण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

सुरुवातीला या ठेकेदारांना ३ वर्ष कालावधीकरीता काळ्या यादीत समाविष्ट केले आहे. या १८ ठेकेदारांपैकी मे.डी.डी.कन्स्ट्रक्शन, मे.वैदेही कन्स्ट्रक्शन, मे.एस.बी.सवई, मे.पाटील अँण्ड असोसिएट्स, मे.कृती कन्स्ट्रक्शन, मे.राधिका कन्स्ट्रक्शन, मे.बी.के.कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजिनिअरींग, मे.भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, मे.त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, मे.श्री दत्तकृपा एंटरप्रायजेस या १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मे.चैतन्य एंटरप्रायजेस, मे.डी.जे.एंटरप्रायजेस, मे.दीप एंटरप्रायजेस या संस्थांच्या मालक या महिला असून बनावट एफडीआर, बँक हमी प्रकरणी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न करता त्यांना ४ वर्षासाठी काळ्या यादीत समाविष्ट केले आहे.

मे.अतुल आर.एम.सी. यांनी संबंधीत प्रकरणी दोषी असणा-यांवर स्वतः गुन्हा दाखल केलेला असून काळ्या यादीत समाविष्ट केल्याचा आदेशाबाबत जिल्हा सत्र न्यायालय, पुणे येथे दावा दाखल केलेला असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई केलेली नाही. उर्वरीत मे.एच ए भोसले, मे.सोपान जनार्दन घोडके यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही कार्यान्वित आहे. कावेरी प्राजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंन्ट यांच्यातर्फे संतोष किरनळ्ळी यांनी महापालिकेच्या प्रकल्प सल्लागार पॅनेलवर अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रकल्प सल्लागार पॅनेलवर नेमणूक मिळवली होती. या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानुसार त्यांना काळया यादीत टाकण्यात येऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button