breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

उल्हासनगरात महिलेची घरात घुसून हत्या, तीक्ष्ण हत्याराने केले वार

उल्हासनगर – उल्हासनगर शहरात महिलेची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय. कॅम्प नंबर 4 च्या 26 सेक्शन परिसरात मृत विद्या तलरेजा आणि त्यांची मुलगी राहते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी घरात शिरून तीक्ष्ण हत्याराने वार करून दगडाच्या साहाय्याने हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही हत्या कोणी केली याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button