Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पश्चिम रेल्वेची पालघर, वसई-विरारहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद, रुळाला तडा
![Western Railway's Palghar, Vasai-Virar to Mumbai traffic closed, derailment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/mumbai-local.jpg)
विरार – पश्चिम रेल्वेची पालघर, वसई, विरारहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. वैतरणा आणि विरारदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर रुळाला तडे गेल्यामुळे पश्चिम रेल्वेने मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील अर्ध्या तासापासून ही वाहतूक थांबली आहे. वैतरणा आणि विरारदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने काही गाड्या सफाळे येथे थांबलेल्या आहेत तर काही पालघर येथे. सध्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र यासाठी साधारण आणखी अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालघरवरून, बोईसरवरून नोकरीसाठी मुंबईला जाणारे चाकरमानी खोळंबले आहेत.