ताज्या घडामोडीमुंबई

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या कामासाठी आणखी महिन्याची प्रतीक्षा

मुंबई | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मागील ऑगस्टपासून बंद असलेले वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला होता. परंतु हे काम सुरू होण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. कंत्राटदाराने काम सुरू करण्यासाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे.

१७.१७ किमीच्याWaiting another month for work on Bandra-Versova sea bridge आणि सात हजार कोटी रुपये खर्चाच्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम ‘वी बिल्ड, अस्टाल्डी’ या कंपनीला देण्यात आले. वी बिल्ड कंपनीसह यात ‘रिलायन्स इन्फ्रा’ कंपनीची भागीदारी होती. पण या कंत्राटदारांनी दोन वर्षांत केवळ अडीच टक्केच काम पूर्ण केले. तर ऑगस्ट २०२१ मध्ये काम पूर्णपणे बंद केले. त्यामुळे एमएसआरडीसीने कंत्राटदारावर नोटीस बजावत कडक कारवाईचे संकेत दिले. त्यानंतर दिवसाला साडेतीन कोटी रुपये दंड आकारण्यात आला. मात्र त्यानंतरही कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. या पार्श्वभूमीवर कंत्राट रद्द होण्याच्या शक्यतेमुळे अखेर कंत्राटदाराने काम सुरू करण्यास होकार दिला. त्यानुसार वी बिल्डने नव्या भागीदाराची निवड केली आहे. अपको कंपनीशी भागीदारी करीत एकत्रित सागरी सेतूचे काम सुरू करण्यास एमएसआरडीसीकडून मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात काम सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. आता मात्र काम सुरू होण्यास आणखी एक महिना लागण्याची शक्यता असल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वी बिल्ड, अस्टाल्डी कंपनीतील भागीदार रिलायन्स इन्फ्रा आर्थिक अडचणीत असल्याने सागरी सेतूचे काम रखडले असे कारण पुढे करीत कंत्राटदाराने आता ‘अपको’ कंपनीशी भागिदारी केली आहे. वी बिल्डला आपले शेअर देत रिलायन्स इन्फ्रा प्रकल्पातून बाहेर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button