‘स्वतःला वाघ म्हणवणारे उद्धव ठाकरे आता पवारांच्या ताटाखालील मांजर झाले’
![Uddhav Thackeray, who calls himself a tiger, is now a cat under Pawar's tutelage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/cm.jpg)
मुंबई – सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एवढेच नाही तर याच मुद्द्यावर संसदेतही जबरदस्त गदारोळ बघायला मिळाला.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोपांनंतर विरोधक काहीसे आक्रमक झाले आहेत. भाजपाकडून राज्यभरात विविध ठिकाणी राज्य सरकारच्या आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर भाजपाने ट्विटरद्वारे पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधाला आहे.
भाजपा महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे म्हणाले की, ‘केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असं भाजपानं ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री @OfficeofUT हे आता @PawarSpeaks यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. #ResignanilDeshmukh pic.twitter.com/mKH8n77P1B
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021