…तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल- जलसंपदा मंत्री जयंत पाटील
![… Then the people will have more faith in their beloved Prime Minister - Water Resources Minister Jayant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/jayant-patil-modi.jpg)
मुंबई |
‘मी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालो होतो’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशातील विधानांवर अजूनही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधानामुळे मोदींचा दोन दिवसीय बांगलादेश दौराही चांगलाच चर्चेत राहिला. मात्र आता याचं विधानांवरून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा काढला आहे.
मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत आपण योगदान दिल्याचं म्हटलं होतं. या विधानावरून जयंत पाटील यांनी आता मोदी यांच्यावर निशाणा साधला. “आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले. त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली, तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असं म्हणत पाटील यांनी मोदींना चिमटा काढला आहे.
आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा !
मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल.— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 29, 2021
वाचा- पवार-शाह भेटीची चर्चा; भाजपा आमदाराने फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर