भाजपाला जितक्या वेळा पराभूत करणार तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार, मलिकांची टीका
![Minister Nawab Malik questioned by ED](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/navab-malik.jpg)
नवी दिल्ली – दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल डिझेलचे उत्पादन शुल्क कमी केले. यावरून राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल – डिझेलचा भाव कमी होत राहणार. ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले आहे.
देशभरात अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे मंगळवारी निकाल जाहीर झाले. हिमाचल प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तर निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी दरात कपात करण्यात आल्याने विरोधक भाजपावर निवडणूक हरल्यामुळे दरात कपात केल्याची टीका करत आहेत.
“केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला. यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे,” असं ते म्हणाले.
दरम्यान जनतेला केंद्रसरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात ‘भाजप हराओ दाम घटाओ’ असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाले आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले.