Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही – विजय वडेट्टीवार
![The lockdown is not fully lifted - Vijay Vadettiwar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/vijay-wadettiwar-criticised-Danave.jpg)
मुंबई – लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत, असे वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणे अनिवार्य आहे.’
‘राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे पण पूर्णपणे अनलॅाक करण्यात आलेलं नाही. तर काही अटीच शिथिल केल्या आहेत. एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 युनिटलाच अनलॅाकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल’, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.