ताज्या घडामोडीमुंबई
कल्याण येथे तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित
![Technical failure at Kalyan; Central Railway traffic disrupted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Kalyan-Staion.jpg)
मुंबई | कल्याण स्थानकावर क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. यामुळे कर्जत, खोपोली आणि पुण्याकडे जाणारी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
नेमका बिघाड कशामुळे झाला याचे कारण तपासले जात आहे. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत/खोपोलीकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. त्याचा परिणाम कसारा बाजूच्या वाहतुकीवरही होत आहे.
या क्रॉसिंग पॉईंटवरूनच रेल्वे आपला ट्रॅक बदलत असतात. संध्याकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने ऑफिसमधून घरी निघालेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.