टाटा हॉस्पिटलला बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
![Tata Hospital to get 100 flats in Bombay Dyeing, announces Jitendra Awhad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/jitendra-awhad-1.jpg)
मुंबई – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला टाटा कॅन्सर रुग्णालयायांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलीय.
100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहेत. स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज सांगितलं, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या..१५ मिनिटात निर्णय झाला, बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे. विसंवाद असता तर २४ तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असंही आव्हाड यांनी म्हटलंय.