breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराष्ट्रिय

तळीराम झिंगाट ! 24, 25 व 31 डिसेंबरला बार पहाटे पाच वाजेपर्यंत राहणार सुरू

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागताचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे थर्टीफर्स्टच्या जल्लोषासाठी मोठ-मोठ्या हॅाटेलपासून ते ढाब्यापर्यंत सर्वत्र लगबग सुरू आहे. मद्यप्रेमींनीही आतापासूनच पार्टीचं आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईही थर्टीफर्स्टचा जल्लोष साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही कंबर कसली आहे. दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील गिरगाव, बँडस्टँड, मरीन लाइन्स, जुहू, नरिमन पॉइंट येथेही तरुणाई मोठ्या संख्येने गर्दी करत असते.

नाताळ आणि नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार आणि रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तसंच या तिन्ही दिवशी वाईन शॉपदेखील रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. गृह खात्याने एक्साईज विभागाशी चर्चा करुन गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button