सुप्रिया सुळेंनी चिमटा काढत केलं मोदी सरकारचं अभिनंदन; म्हणाल्या…
![Supriya Sule tweaks and congratulates Modi government; Said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/supriya-sule-1.jpg)
मुंबई |
अल्पबचत योजनांवरील व्याजदराच्या निर्णयावर घुमजाव केल्यानंतर मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. विरोधकांकडून सरकारच्या यू-टर्न भूमिकेवर आणि झालेल्या चुकीवरही निशाणा साधला जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी सरकारला यू-टर्न भूमिकेवरून चिमटा काढला आहे. तसंच अभिनंदनही केलं आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील अर्थात पीपीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश अर्थ मंत्रालयाने बुधवारी काढला होता. हा निर्णय काही तासांतच सरकारने मागे घेतला. सरकारच्या निर्णय मागे घेण्याच्या भूमिकेचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं असून, अशाच निर्णय पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीबाबत घेण्याची विनंती केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारनं तातडीनं फिरविला. सरकारचं याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारनं अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती. @nsitharaman https://t.co/IwaBd8Z21X
— Supriya Sule (@supriya_sule) April 1, 2021
वाचा- PPF वरील व्याजदर जैसे थे: तो आदेश चुकून निघाला- अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण