TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

रखडलेले मराठी भाषा उपकेंद्र इमारत बांधकाम लवकरच सुरु होणार

निधी मंजूर होऊनही अनेक वर्षापासून मराठी भाषा केंद्र आणि उपकेंद्र काम रखडलेले आहे. याचे उपकेंद्र ऐरोली येथे प्रस्तावित असून त्याची पाहणी करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आले होते. यावेळी सदर इमारतीचे काम १५ ते २० दिवसात सुरु होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

मराठी भाषा संशोधनासाठी मराठी भाषा केंद्र उभारणी करण्याची घोषणा काही वर्षापूर्वी करण्यात आली होती. मराठी भाषा केंद्र हे मुंबई येथील चर्नी येथे तर उपकेंद्र नवी मुंबईतील ऐरोली येथे उभे करण्यात येणार होते. नवी मुंबईतील उपकेंद्र उभारणी आद्योगिक विकास महामंडळ द्वारा होणार आहे. यासाठी १२६ कोटीचा खर्च अपेक्षित असून ऐरोलीतील उपकेंद्रासाठी २६ कोटींचा निधी अपेक्षित आहे. या उपकेंद्रासाठी १० कोटी निधी मंजूर झाला आहे विशेष म्हणजे निविदा प्रक्रिया पार पडून कंत्राटदार नेमण्यात आला मात्र तरीही हे काम रखडले आहे. त्यामुळे गुरुवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाहणी दौरा करून सर्व माहिती घेतली तसेच काम लवकरात लवकर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ग्रंथालय साहित्य संस्कुती मंडळ, अभ्यास वाङ्मय आदी भाषा अभ्यास बाबत सर्व काही आवश्यक असणार आहे. हेही वाचा- उरण: ३७ कोटींचे डिझेल परतावे थकल्याने मच्छिमार आर्थिक संकटात या बाबत अधिक माहिती देताना उदय सामंत यांनी सांगितले की, सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊनही हे काम रखडले हि खंत आहे त्यामुळे येथे पाहणी करून योग्य त्या सर्व सुचना देण्यात आल्या आहेत येत्या १५ त वीस दिवसात केंद्र आणि उपकेंद्र दोन्ही ठिकाणी काम सुरु होईल. या शिवाय वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन का रखडले याची माहिती घेऊन तेही काम लवकरात लवकर सुरु करण्यात येईल असे त्यांनी सांगितले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे केलेली पूजा आणि ज्योतीस्याची भेट यावर टिका करण्यात येत असल्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी विरोधीपक्ष हे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button