स्कायमेटने वर्तवला पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात कसा असेल मान्सून
![Skymet forecasts rains, what will be the monsoon in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Skymet-forecasts-rains-what-will-be-the-monsoon-in-Maharashtra.jpg)
मुंबई | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, कारण यंदा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सून २०२२ ची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी आणि कृषी क्षेत्राशी (Agriculture) संबंधित लोकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहिल असा अंदाज खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली होईल आणि जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित आहे, असंही स्कायमेटकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल
खरंतर, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. या दरम्यान गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यंदाचा मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने मान्सून २०२२ चा अंदाज जारी केला आहे. यानुसार यंजा सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एजन्सीच्या मते, यावर्षी मान्सून सामान्य असेल आणि सरासरी पावसाच्या तुलनेत २०२२ मध्ये ९८% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार…
– राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि ईशान्येकडील त्रिपुरा सोबतच संपूर्ण हंगामात पावसाच्या कमतरतेची शक्यता आहे.
– केरळ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात जुलै आणि ऑगस्टच्या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल.
– पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्र आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.
– जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल
स्कायमेटच्या मते, २०२२ मध्ये कोणत्या महिन्यात कसा पाऊस पडेल?
– जूनमध्ये, LPA (Lakhs Per Annum)(१६६.९ मिमी) च्या तुलनेत १०७% पाऊस पडू शकतो.
– जुलैमध्ये, LPA (२८५.३ मिमी) च्या तुलनेत १००% पाऊस पडू शकतो.
– ऑगस्टमध्ये, LPA (२५८.२ मिमी) च्या तुलनेत ९५% पाऊस पडू शकतो.
– सप्टेंबरमध्ये, LPA (१७०.२ मिमी) च्या तुलनेत ९०% पाऊस अपेक्षित आहे.