शिवसेना २०२४ मध्ये दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंचा निर्धार
![Shiv Sena will sit in Delhi in 2024; Aditya Thackeray's decision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/aditya-thackeray-1.png)
मुंबई | प्रतिनिधी
मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024 ला शिवसेना तिथे बसेल आणि सगळे थांबवेल. शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल. केंद्रीय एजन्सीचे जे काम सुरू आहे, ते केवळ प्रचारासाठीच सुरू आहे. कोणतेही राज्य त्याला घाबरणार नाही, झुकणार नाही. त्यासाठी शिवसेना २०२४ मध्ये दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असा निर्धार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
आज मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मरिन ड्राईव्हला आपण मराठी भाषा मंडळाची इमारत उभारत आहोत. मराठी बदलत आहे. मराठी भाषेचा अभ्यास करण्याकरता वाचनालय उभारत आहोत. गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालन सुरु करत असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त चित्रीकरण मुंबईत होतील याकरता प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. मराठी भाषेच्या शाळा, मातृभषेतील शाळा कमी होतात की जास्त यावरुन वाद सुरु असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मुंबई महापालिकेच्या १ हजार २३२ शाळा आहेत. मात्र, कोणतेही बोर्ड असो १० वी पर्यंत मराठी शिकवलेच जाईल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.