breaking-newsTOP Newsमुंबई

संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ईडी तपासात उघड

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पत्रा चाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय करत होतं. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

बुधवारी ईडीने मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरचाही समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पत्रा चाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचालाकांच्या मालकींच्या गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले.

ईडीच्या पथकाने श्रद्धा डेव्हलपर्सच्या मुलुंडमधील कार्यालयातील कागदपत्रं आणि संगणकांची छाननी केली. श्रद्धा डेव्हलपर्सचे सुनील राऊत यांच्या मतदारसंघात येणाऱ्या भांडूप, मुलुंड, विक्रोळीत अनेक प्रकल्प सुरु आहेत. ३१ जुलैला निवासस्थानी छापा टाकण्यात आल्यानंतर ईडीला संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब श्रद्धा डेव्हलपर्समधील संचलाकांची मालकी असलेल्या दोन आलिशान गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने बुधवारी अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवरही छापा टाकला. ही कंपनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी सुरु केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button