सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ, १० दिवसांची पोलीस कोठडी
![Sachin Waze's bail application rejected by NIA court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Sachin-Vaze.jpg)
मुंबई – मुंबईतील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सचिन वाझे यांची NIA तब्बल १३ तास चौकशी केली होती. त्यानंतर NIA ने सचिन वाझे यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाचा :-स्फोटक प्रकरणातील इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच, धक्कादायक माहिती समोर
आता पोलीस कोठडीत सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तर दुसरीकडे एनआयएच्या कार्यालयात सचिन वाझे यांचे सहकारी असलेल्या CIU युनिटमधील चार अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यापैकी वाझेंचे सहकारी रियाझ काझी यांची पाच तासांपेक्षा अधिक काळापासून चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता एनआयए आता आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेणार का, हे पाहावे लागेल.