नवी मुंबई मेट्रो रेल्वेची जबाबदारी महामेट्रोकडे
![Responsibility of Navi Mumbai Metro Railway to Mahametro](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/mumbai-metro-759-e1444445427787.jpg)
नवी मुंबई – महाराष्ट्रातील मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेची जबाबदारी महामेट्रो कंपनीला देण्यात आली आहे. महामेट्रोला दहा वर्षांसाठी सिडकोने हे कंत्राट दिले असल्याची माहिती महामेट्रोने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. नवी मुंबई मेट्रोरेलचा विकास सिडकोने केला आहे.
याबाबत सिडकोने एक लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स जारी केले आहे. या दोन संस्थांमध्ये लवकरच करार करण्यात येणार आहे. नवी मुंबईच्या मेट्रो लाईन १ ही साधारण २२ किलोमीटर आहे. यात ११ स्थानकांचा सामावेश असून ही लाईन बेलापूर सीबीडी ते पेंढरपर्यंत जाते. तळोजामध्ये मेंटनन्स डेपो आणि खारघरमध्ये दोन उपस्थानके आहेत. या लाईनचे काम गतीने पूर्ण होत आहे. या लाईनवर ट्रॅक लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोबतच ११ किलोमीटर ट्रॅकवर ओव्हरहेड इक्विपमेंट लावण्याचे कामही झाले आहे. चाचणीसाठी फाइन ट्युनिंग करण्यात येत आहे.