Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

वाशी टोल नाका येथे मराठा क्रांती मोर्चाचा रास्ता रोको अंदोलन

नवी मुंबई – मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. वाशी टोलनाका येथे नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाने रास्तारोको करून आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळं केला. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. तसेच सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देऊन न्यायालयाने याचा फेरविचार करून समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली.

मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. यानिर्णयानंतर राज्यात नाराजी आणि संताप अशी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा समाजासोबत विरोधी पक्षानेही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button