तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये – मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/uddhav-thackeray.jpeg)
मुंबई – भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळत असतानाच तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असणार, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही धोका असल्याचे सांगण्यात आले असले तरी चिमुकल्यांच्या पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही’, असे म्हणत राज्यातील जनतेला धीर दिला.
तसेच ‘लहान मुलांच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला पाळा आणि चिमुकल्यांवर घरीच कोणतेही औषध देऊन उपचार करू नका’, असे महत्त्वाचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर कोरोना काळातील संकटांचा आढावा घेत राज्य शासन सर्वतोपरी पावलं उचलत असून नागरिकांनीही आतापर्यंत सहकार्य केले तसेच यापुढेही कराल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
Prevention of COVID in children by Maharashtra’s Pediatric Taskforce – LIVE https://t.co/9xtylwjAx7
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 23, 2021