रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक हार्बर मार्गावर विशेष लोकल चालणार
![72-hour jumbo megablock on Central Railway from midnight today; Many express, local canceled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/freepressjournal_import_2018_10_Mega-Block-thane.jpg)
मुंबई – मध्य, हार्बर, ट्रान्स आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल- दुरुस्तीसाठी उद्या रविवारी ४ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान, ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान मेगाब्लॉक असून या वेळेत मुलुंड ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.तसेच अप दिशेकडील लोकल मुलुंडनंतर जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि नियोजित वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशीराने शेवटच्या स्थानकात दाखल होतील.
हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन (बेलापुर/नेरुल-खारकोपरसह) मार्गावर सकाळी १२.०५ ते सांयकाळी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असून या कालावधीत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन दिशेकडील लोकल रद्द केल्या जातील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष सेवा चालविल्या जातील. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन सेवा रद्द केली आहे. खारकोपर ते नेरुळ/बेलापूर अप आणि डाऊन बीएसयूवरील सेवा रद्द केली आहे. ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी/नेरुळ सेवा सुरू असेल.तसेच बोरीवली ते गोरेगाव अप जलद मार्गावर शनिवार- रविवारी रात्री११ ते रात्री ३ पर्यंत मेगाब्लॉक असून कालावधीत बोरीवली ते गोरेगाव अप जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक नसेल