ताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी घट
मुंबई | मुंबईत करोना रुग्णसंख्येत सोमवारी मोठी घट नोंदविण्यात आली़ दिवसभरात १९२ नवे रुग्ण आढळल़े तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी रुग्णनोंद आह़े मुंबईत दिवसभरात ३५० रुग्ण करोनामुक्त झाल़े त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाली आह़े २५१३ जणांवर उपचार सुरू आहेत़ रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने मुंबई पालिका आणि आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आह़े दरम्यान, राज्यातही रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, १,९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली़ दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ११४०८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ३६,४४७ झाली आहे.