जयश्री पाटील नॉट रिचेबल; मुंबई पोलिसांचे संरक्षणही सोडले, तपासासाठी पथके रवाना
![Jayashree Patil Not Reachable; Leaving the protection of Mumbai Police, squads were sent for investigation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Jayashree-Patil-Not-Reachable-Leaving-the-protection-of-Mumbai-Police-squads-were-sent-for-investigation.jpg)
मुंबई| जयश्री पाटील यांनी मुंबई पोलिसांनी दिलेले संरक्षण सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी पत्नी जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडले असून आता पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अॅड. जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. ९ तारखेला गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर केल्यापासून जयश्री पाटील यांनी पोलिसांचे संरक्षण सोडले आहे. गुणरत्न सदावर्तेना कोर्टात हजर केल्यावर त्या उपस्थित होत्या मात्र तेव्हा त्या पोलिस संरक्षणाशिवाय आल्या होत्या.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्ययक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा कट गुणवंत सदावर्ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आंदोलनाच्या आदल्या दिवशी शिजला. पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा सल्ला गुणवर्तेंच्या पत्नी जयश्री यांनी दिला, अशी माहिती मुंबई पोलिसांतर्फे बुधवारी गिरगाव न्यायालयात देण्यात आली. जयश्री पाटील यांना वॉण्टेड दाखवण्यात आलं असून मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून त्या नॉटरिचेबल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.
तपासामध्ये पोलिसांच्या हाती आलेले काही पुरावेदेखील न्यायालयास सादर करण्यात आले. यामध्ये सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सूर्यवंशी याने सदावर्ते यांना ८५ लाख रुपये जमा करून दिले असून, त्याला पुण्याहून अटक करण्यात आली. त्याच्यासमक्ष इतर आरोपींची देखील चौकशी करायची असल्याचे सांगून त्यांनी पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र सदावर्ते यांच्या वकिलांनी पोलिस कोठडीत विरोध केला. अभिषेक पाटील याची आंदोलनामधील भूमिका पोलिसांच्या वतीने कोर्टात विस्तृतपणे सांगण्यात आली.