breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आयपीएस सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक; दोन वर्षांसाठी नियुक्ती

मुंबई– भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची ‘सीबीआय’च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.

सुबोधकुमार जयस्वाल हे १९८५च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्लीत भारताची गुप्तचर संस्था म्हणजे रिसर्च अँड ऍनालिसिस विंगमध्ये काम केले आहे. दत्ता पडसलगीकर यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात सुबोधकुमार जयस्वाल यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना महाराष्ट्रातील पोलीस खात्याची संपूर्ण माहिती आहे. फेब्रुवारी २०१९ ते जानेवारी २०२१ म्हणजे जवळपास २ वर्षांचा त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अनुभव आहे. याशिवाय ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्तही होते. जुलै २०१८ मध्ये ते मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. यानुसार त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरील १ एक वर्षाचा अनुभव आहे. इतकेच नव्हे तर सुबोध कुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी विभागातही काम केले आहे.

महाराष्ट्रातील २० हजार कोटींच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे सुबोध कुमार जयस्वाल हे प्रमुख होते. त्यांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी केली आणि सर्व धागेदोरे समोर आणले. मालेगावमध्ये सप्टेंबर २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशीही जयस्वाल यांनी केली आहे. त्यावेळी जयस्वाल हे महाराष्ट्र एटीएसचे उपमहानिरीक्षक होते.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button