ताज्या घडामोडीमुंबई
उद्योगपती महिंद्रा मेडिकल कॉलेज उभारणार; ट्विट करून दिली माहिती
![Industrialist to set up Mahindra Medical College; Information tweeted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/anand-mahindra.png)
मुंबई | भारतात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च करावा लागतो. म्हणून विद्यार्थी युक्रेनमध्ये जातात. युक्रेनमध्ये भारताचे विद्यार्थी संकटात आहेत. आता यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबत माहिती दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी भारतात वैद्यकीय कॉलेज सुरु करण्याची गरज समजून ट्विट केले आहे. ”मला माहित नव्हते भारतात वैद्यकीय कॉलेज एवढे कमी आहेत. सीपी गुरनानी वैद्यकीय अभ्यासासाठी महिंद्रा विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय संस्था सुरू करू शकतो का?” असे या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सीपी गुरनानी यांना टॅग केले आहे.