“हल्ला करून तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील तर…”, दगडफेकीचा व्हिडीओ ट्वीट करत पडळकरांचा निशाणा!
!["If your boss is going to be the Prime Minister by attacking…"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/gopichand-padalkat-car-stone-pelting-ncp-chief-sharad-pawar-1.png)
मुंबई |
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. यामध्ये पडळकराच्या गाडीची पुढची काच फुटली. मात्र, या मुद्द्यावरून राज्या आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. पडळकरांनी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केल्यामुळेच अशा प्रकारे गाडीवर दगड फेकण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू असताना पडळकरांनी काल संध्याकाळी नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये एका व्यक्तीने पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकल्याचं दिसत आहे.
हल्ल्याविषयी गोपीचंद पडळकर म्हणतात…
हा व्हिडीओ शेअर करताना गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निषाणा साधला आहे. “प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे”, असं ट्वीट गोपीचंद पडळकर यांनी व्हिडीओसोबत केलं आहे.
प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे… अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही…
माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे…@BJP4Maharashtra@PawarSpeaks pic.twitter.com/XSOzmUaU4i— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 1, 2021