Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेला दणका; माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | प्रतिनिधी
शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी आज असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.
या पक्षप्रवेशावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.





