वैश्विक आव्हाने असतानाही भारताचा वस्त्रोद्योग तेजीत
आर्थिक वर्षात भारताच्या वस्त्र आणि परिधान निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 6.32 टक्के वाढ

मुंबई : भारतीय वस्त्र उद्योग परिसंघ (सीआयटीआय) ने एक मोठी माहिती दिली आहे. सीआयटीआयच्या नुसार, 31 मार्च 2025 संपलेल्या चालू आर्थिक वर्षात भारताच्या वस्त्र आणि परिधान निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 6.32 टक्के वाढ झाली आहे. या वृद्धीसाठी कापड उद्योग अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. या विश्लेषणातून हेच समोर येतंय की, वस्त्र आणि परिधान निर्यातीत ही वृद्धी मुख्यत्वे परिधान निर्यातीने झाली आहे. यात चालू आर्थिक वर्षात 10.03 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
CITI चे अध्यक्ष काय म्हणाले?
सीआयटीआयचे अध्यक्ष राकेश मेहरा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैश्विक आव्हाने असताना परिधान निर्यातीत मजबूत कामगिरी आणि वस्त्र उद्योगात स्थिर वृद्धी भारतीय कपडा आणि परिधान उद्योगाला मजबुती, अनुकूलशीलता आणि वैश्विक प्रतिस्पर्धात्मकतेला उजागर करत आहे, असं राकेश मेहरा म्हणाले. त्यांनी याचं सर्व श्रेय नव्या व्यापार आघाडी बनवण्याला आणि वाढता वेग आणि सरकारच्या सहाय्यक धोरणांना दिलं आहे. सरकारच्या धोरणांमुळे निर्यातदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात मदत झाली आहे.
हेही वाचा – अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोठा निर्णय; आता १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार, ते कसे? जाणून घ्या…
भारतासाठी संधी
ही वाढ कायम ठेवण्यासाठी उद्योग जगत आशावादी आहे, असं मेहरा यांनी म्हटलंय. खासकरून विकसित होत असलेल्या वैश्विक व्यापार गतिशिलतेला पाहता ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेहरा म्हणाले की, अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेला व्यापार तणाव भारतासाठी धोरणात्मक दृष्टया संधी निर्माण करणारा आहे. खासकरून कापड आणि परिधान उद्योगात. भारत चीनच्या पुढे जाण्यास आणि अमेरिकेचा एक विश्वासू तसेच आवडता भागीदार बनण्यासाठी चांगली स्थिती आहे. त्यासाठी सक्रिय कूटनिती आणि अधिक अनुकूल तसेच स्थिर टॅरिफ व्यवस्था मिळवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे.
अमेरिका-चीनच्या लढाईत वाढ
यावर्षी मार्चमध्ये भारतीय कपडा निर्यातीत मार्च 2024च्या तुलनेत सुमारे 5.81 टक्क्याने घसरण झाली आहे. तर याच काळात परिधान निर्यातीत 3.97 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2025च्या दरम्यान कापड आणि परिधानच्या संचयी निर्यातीत मार्च 2024च्या तुलनेत 1.63 टक्क्यांची घसरण झाली आहे.
3.61 टक्के वाढ
एप्रिल 2024पासून मार्च 2025 च्या दरम्यान भारतीय कापड निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.61 टक्के वाढ झाली आहे. तर या काळात परिधान निर्यातीत 10.03 टक्क्याने वाढ झाली आहे. सीआयटीआय विश्लेषणानुसार, ही वाढ समग्र वस्तू निर्यातीच्या कामगिरीच्या पुढे निघून गेली आहे. यापूर्वी ती याच कालावधीत बऱ्यापैकी स्थिर होती.