कामं लवकर आटपून घ्या; पुढचे 7 दिवस बँका बंद
![Bank employees strike on December 16 and 17 against privatization](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Banks-1.jpg)
मुंबई – वाचकांनो, बँकेत एखादे महत्त्वाचे काम असल्यास तुम्हाला घाई करावी लागणार आहे. येत्या दोन दिवसांतच तुम्ही कामे आटपून घ्या कारण त्यानंतर पुढील 7 दिवस बँका बंद राहणार आहेत. 27 मार्च ते 29 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर फक्त 30 मार्च आणि 3 एप्रिल हे दोन दिवसच बँकेतील दैनंदिन कामकाज सुरू राहील.
महिन्यातील चौथा शनिवार आणि होळीच्या सणासाठी 27 मार्च ते 29 मार्च या काळात सार्वजनिक आणि खासगी बँका बंद राहतील. त्यानंतर 31 मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचे दैनंदिन कामकाज बंद असेल. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी 30 मार्च आणि 3 एप्रिल हे फक्त दोन दिवस उपलब्ध असतील. परंतु इयर एडिंगच्या वर्क लोडमुळे या दोन दिवसांतही बँकांमध्ये कितपत कामकाज होईल, याबाबत शंका आहे.
बँका कधी बंद आणि कधी सुरू राहणार?
27 मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद राहणार.
28 मार्च – रविवार असल्याने बँका बंद राहणार.
29 मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहणार.
30 मार्च – यादिवशी बँका सुरू राहतील, मात्र पाटण्यातील बँक व्यवहार बंदच राहतील.
31 मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
1 एप्रिल – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
2 एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहणार.
3 एप्रिल – यादिवशी बँका सुरु राहणार.
4 एप्रिल – बँकांना रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी असेल.