राज्यात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा: उपमुख्यमंत्री अजित पवार
![Effectively implement 'anti-witchcraft law' in the state: Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/ajit-pawar.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
जादुटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याबाबत आज बैठक पार पडली. यावेळी जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अमंलबजावणी समितीनं कामकाजाला गती देऊन राज्यात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले .
या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावं.आजही अंधश्रध्देमुळे अनेक असहाय्य गरिबांची फसवणूक होते.अशा लोकांत जनजागृती गरजेची आहे. जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अमंलबजावणी समितीचे गठन करण्याबाबत सामाजिक न्याय विभागानं कार्यवाही करावी.
जादुटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबवण्याबाबत आज बैठक पार पडली. यावेळी जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अमंलबजावणी समितीनं कामकाजाला गती देऊन राज्यात 'जादुटोणा विरोधी कायद्याची' प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले. pic.twitter.com/HYT8fJDqpc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 7, 2021