Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

सलमान खानच्या इमारतीत सापडल्या डेंग्यूच्या अळ्या, मुंबई पालिकेकडून औषध फवारणी

मुंबई । महाईन्यूज । सलमान खानला काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या इमारतीत दोन ठिकाणी अळ्या सापडल्या आहेत. मुंबई महापालिकेने केलेल्या पाहणीत तिथे डेंग्यूच्या अळ्या आढळला आहे. त्यामुळे पालिकेने गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये फवारणी केली आहे.

सलमान खान घरी नसताना महापालिकेने त्याच्या घरी जाऊन औषधांची फवारणी केली. त्यावेळी पालिकेच्या पाहणीत दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

सलमान खान नुकताच एका वाढदिवसाच्या पार्टीत दिसला आणि सलमान खानची तब्येत बरी असल्याचे पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमान खूपच हेल्दी दिसत आहे. यावरून सलमान खान डेंग्यूमधून बरा झाल्याचं स्पष्ट होतंय.

असे सांगितले जात आहे की सलमानने मंगळवारी त्याचा मेहुणा आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत भव्य सहभागी झाला होता. नेहमीप्रमाणेच त्याला पुन्हा त्याच्या रूपात पाहून चाहते आनंदी झाले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांनुसार, सलमानला गेल्या आठवड्यात डेंग्यू झाला होता. गेल्या आठवड्यात एका सूत्राने मीडियाला सांगितले की, सलमानची तब्येत बरी नाही आणि त्याने ‘बिग बॉस’ होस्टिंगमधून थोडा ब्रेक घेतला आहे. तथापि, डेंग्यूमधून सलमान बरा झाल्याच्या बातम्यांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही.

बिग बॉसशिवाय सलमान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त होता. या चित्रपटाशिवाय तो ‘टायगर 3’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button