पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा निर्णय; पारपत्र पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही
![Decision of Commissioner of Police Sanjay Pandey; No need to go to the police station for passport verification](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/vv1-passport.jpg)
मुंबई | पारपत्र (पासपोर्ट) पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. पांडे यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली.पांडे यांनी हा निर्णय जाहीर करताना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार नाही. पण अपवादात्मक स्थितीत नागरिकांना पोलीस ठाण्यात यावे लागेल, असेही पांडे यांनी स्पष्ट केले. तसेच या निर्णयाचे पालन होत नसेल, तर थेट तक्रार दाखल करा, असे आवाहनही त्यांनी केले.
पारपत्र पडताळणीच्या जुन्या प्रक्रियेबाबत अनेक नागरिकांनी तक्रार केली होती. कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही प्रक्रिया आणखी किचकट करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या घरी येणारा पोलीस अंमलदारच पारपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया करणार आहे.