दाऊदचा भाऊ पाकिस्तानपेक्षा महाविकास आघाडीत सक्रिय; निलेश राणेंकडून खळबळजनक फोटो ट्विट
![Dawood's brother is more active in Mahavikas front than Pakistan; Exciting photo tweet from Nilesh Rane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/nilesh-rane-tweet.png)
मुंबई | मुंबई महापालिकेच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर याच्याबरोबरचा फोटो समोर आला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. निलेश राणे यांनी म्हटले आहे की, दाऊद जेवढा पाकिस्तानमध्ये सक्रिय नसेल, त्यापेक्षा अधिक महाविकास आघाडीत सक्रिय दिसतोय, अशी टीका निलेश राणे यांनी यावेळी केली.
हा फोटो शिवसेना सदस्यता अभियान मागपाडा शाखा क्रमांक 213 येथील असल्याचे फोटोतील डिजिटल बॅनरवरुन दिसून येते. देशमुखांचा राजीनामा घेतला, मग मलिकांचा का नाही? मराठा समाजाच्या अनिल देशमुखांचा राजीनामा लगेच घेतला, मग नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला नाही. दाऊदसारख्या देशाचा दुश्मन असलेल्या व्यक्तीच्या माणसांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली आहे. नवाब मलिक हे पवार कुटुंबीयांसाठी काही स्पेशल आहेत का, नवाब मलिक शरद पवारांबद्दल काही बोलेन, अशी भिती तर नाही ना? अशी शंकाही निलेश राणे यांनी व्यक्त केली.