Breaking-newsमुंबई
#CoronoVirus:मुंबईतील जेजे पोलीस स्टेशनमधील 28 पोलिसांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Mumbai-police-696x392-1.jpg)
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 16758 वर गेला आहे. पोलिसांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मुंबईतील जेजे पोलीस स्टेशन महाराष्ट्रमधील सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी असलेलं पोलीस स्टेशन बनलं आहे. जेजे पोलीस स्टेशनच्या आणखी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जेजे पोलीस स्टेशनमधील एकूण 28 कर्मचारी व अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. मोजके कर्मचारी सोडून संपूर्ण पोलीस स्टेशन आता क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.