breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वसईत कोरोनाचे १० नवीन रुग्ण; एकूण रुग्ण संख्या पोहोचली १७० वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-new-4.jpg)
वसई विरार शहरात बुधवारी १० नव्या रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण नालासोपारा येथील असून करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील आहेत. यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता १७० एवढी झाली आहे. वसई-विरार शहरातील सामान्य नागरीक करोनाबाधित सापडत नसून मुंबईत ये-जा करणाऱ्या आणि करोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांना करोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. या दहा रुग्णांमध्ये ४ महिला, १० वर्षांची बालिका तसेच ५ पुरूषांचा समावेश आहे. आता पर्यंत ९० जण करोनामुक्त झाले असून ७० जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.