Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वसईत आढळले ६ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/20-2.jpg)
वसई-विरार शहरात रविवारी ६ नवीन रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे एकूण रुग्ण संख्या आता २०८ एवढी झाली आहे. रविवारी नोंद झालेल्या रुग्णांमध्ये नालासोपाऱ्यात तीन तर वसई, नायगाव आणि विरार मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या २०८ एवढी झाली आहे. विरारमधील ६० वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने शहरातील एकूण बळी ११ ऐवढे झाले आहेत.