Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत ६३२ नवे कोरोना रुग्ण, २६ मृत्यू, संख्या ९ हजार ७०० च्याही पुढे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/virus.jpg)
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ६३२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत करोनाची लागण होऊन ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.