breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: मुंबईतील झोपडपट्टीमध्ये पसरतोय कोरोना; चार जणांना झाली लागण

मुंबईमधील कोरोनाबाधितांमध्ये गुरुवारी १५ जणांची भर पडली. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार रुग्ण हे शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील आहेत. त्यामुळेच आता करोना मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये हातपाय पसरु लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईमधील झोपडपट्ट्यांमध्ये विलगीकरणामध्ये राहणे, सोशल डिस्टन्सींग ठेवणे शक्य होणार नसल्याने झोपडपट्टीमध्ये करोनाचे रुग्ण अढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार घाटकोपरमधील झोपडपट्टीमध्ये दोन रुग्ण अढळून आले आहेत. तर इतर दोन रुग्णांपैकी एक रुग्ण कलिना येथील तर दुसरा परळमधील चाळीत अढळून आला आहे. घाटकोपर येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या ६८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे सिद्ध झालं आहे. ही महिला काम करत असणाऱ्या घरातील व्यक्ती परदेशातून आलेली होती. त्या व्यक्तीला करोना झाल्यामुळे त्याचा संसर्ग या महिलेला झाल्याचे सांगितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button